मीरा भाईंदरमध्ये शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांना अल्टिमेटम दिलंय.. भाजपने मीरा-भाईंदरचा निर्णय 24 तासात द्यावा.. अन्यथा आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल.. असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.. मीरा भाईंदर मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीचं घोडे अडलंय... नरेंद्र मेहता यांनी माझा पहिला फोन उचलला नाही. असंही सरनाईक यांनी म्हटलंय... मीरा-भाईंदरला भाजप मोठा भाऊ आहे.. तर ठाण्यात आम्ही मोठा भाऊ आहोत.. त्यामुळे जो ठाण्याला फार्मूला ठरेल तोच मीरा-भाईंदरला ठरायला पाहिजे. असं मत सरनाईक यांनी मांडलंय..