अमेरिकेत सध्या डेविन वादळाचा मोठा परिणाम जाणवतोय. विशेषतः विमानसेवेला. या हिमवादळामुळे दृश्यमानता घटली आहे. म्हणूनच अमेरिकेत शनिवारी तब्बल ९००० देशांतर्गत उड्डाणं एकतर रद्द तरी करावी लागली किंवा विलंबानं चालवावी लागली. याचा फटका नागरिकांना बसलाय. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे सहलींना ब्रेक लागतोय. गेल्या महिन्यातच शटडाऊनमुळे अमेरिकेत विमानसेवेचा बोजवारा उडाला होता आता. हिमवादळामुळे अमेरिकन विमान सेवा कोलमडली आहे