2025 या वर्षात सोन्या चांदीनं भलताच भाव खाल्लाय. दोघांची झळाळी इतकी की अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा झाला.आकडेवारीनुसार यावर्षी सोन्यानं १ लाख रुपयांच्या गुंतवणकीवर ८० टक्के परतावा मिळालाय. तर शेअर मार्केटमध्ये मात्र केवळ ८ टक्के परतावा मिळालाय. तर चांदीची चमकही डोळे दिपवणारी आहे. पाहूया यावर्षी सोन्या चांदीतील गुंतवणूक आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक यात कसा फरक दिसला, आणि कोणत्या गुंतवणुकीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलय