एखाद्या घटनेकडे समाज कसं पाहतो हे बऱ्याचदा त्या समाजाची संस्कृती, राजकीय जडणघडण आणि वैचारिक पातळी या सगळ्यावर अवलंबून असतं असं म्हणतात... पण एकाच वेळी, एकाच भागात एकाच, प्रकारचे दोन गुन्हे घडतात आणि त्या दोन्ही गुन्ह्यांकडे व्यवस्था आणि राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतील तर त्यामागची प्रेरणा फक्त आणि फक्त राजकीय असते हे स्पष्ट असतं... महाराष्ट्रातील दोन घटनांच्या बाबतीत सध्या हेच घडतंय.. एक घटना आहे बीडमधील सरपंचांच्या हत्येची आणि दुसरी आहे परभणीमधील कोठडीतील मृत्यूची.. बीडमधल्या हत्येसाठी फाशीची मागणी होतेय, तर परभणीच्या मृत्यूप्रकरणी माफीची, आणि या दोन्ही मागण्या करणारी व्यक्ती मात्र एकच आहे... भाजपचे आमदार सुरेश धस... धस यांच्या या दोन टोकांच्या दोन मागण्या कोणत्या राजकारणाची दिशा दाखवतायत हाच प्रश्न आहे...