Delimitation Bill | डिलिमिटेशन विधेयकाची कॉपी NDTV मराठीवर, लोकसभेच्या जागेत 50% वाढ करण्याची तरतूद

देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील डिलिमिटेशन विधेयकाची प्रत समोर आली आहे. या विधेयकात सध्याच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार लोकसभेच्या एकूण जागा ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार राज्यांसाठी लोकसभेच्या जागांची कमाल मर्यादा ५३० वरून ८१५ करण्यात येणार आहे.तर केंद्रशासित प्रदेशांसाठी जागांची संख्या २० वरून ३५ करण्याचा प्रस्ताव आहे. नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण लागू होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जागांचे वाटप आणि मतदारसंघांची रचना २०५१ पर्यंत कायम ठेवण्याची तरतूद या विधेयकात असल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ