Delimitation Bill वरुन 'मविआ'फुटीच्या उंबरठ्यावर ? Congress ची भूमिका काय ? NDTV ला प्रतिक्रिया

संसदेच्या विशेष सत्राच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीला हादरे बसू लागलेत. केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन बिल मांडलं जाईल. आणि या बिलाला शरद पवार गटाकडून पाठिंबा दिला जाण्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत चलबिचल वाढलीय. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये डिलिमिटेशनवरून मतभेद आहेत.. एवढच नाही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं दिसतंय.. शरद पवार गटात जितेंद्र आव्हाड पाठिंब्याची तयारी दाखवतात. तर धैर्यशील मोहिते पाटील विरोधाची भूमिका घेतायत.. दुसरीकडे ठाकरे गटात अनिल देसाई इंडिया आघाडीसोबत असल्याचं सांगतात तर अरविंद सावंत काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते असे संकेत देतात.. त्यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय..

संबंधित व्हिडीओ