निवडणूक म्हटलं की सामान्य कार्यकर्ता डोळ्यासमोर उभा राहतो. याच कार्यकर्त्याना जर डावललं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय कोल्हापुरात आलाय.खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरून 24 उलटत नाहीत तोवर माघार घेतली. माघारीच्या या निर्णयानं कार्यकर्ते खडबडून जागे झाले.. राजकीय वर्तुळात आता याची जोरदार चर्चा सुरु झालीये.. अवघ्या एका दिवसात असं काय घडलं ज्यामुळे कृष्णराज महाडिकांनी हा निर्णय घेतला.. या अर्ज माघारीचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून.