Dr.Babasaheb Ambedkar Jayanti|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती, चैत्यभूमीवर जय्यत तयारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दादर येथील चैत्यभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर सकाळी 9.30 वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करतील गावोगावी  मिरवणुका काढून बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केले जात आहे.. सर्वत्र निळे झंडे आणि पंचशील ध्वजाचे दर्शन घडते आहे... भीमगीतांची आज खास रेलचेल आहे. विशेष म्हणजे, आज मुंबई येथील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंची गर्दी उसळणार आहे.

संबंधित व्हिडीओ