राज्यामधील पस्तीस जागांवरती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. कुठे गुरु शिष्य तर कुठे काका पुतण्या आमनेसामने असणार आहेत. बारामतीमध्ये इंदापूर आंबेगावमध्ये सुद्धा थेट लढत पाहायला मिळणार आहे. जनता कोणत्या राष्ट्रवादीला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.