भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे गुरुवारी युक्रेन दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची भेट घेतली.भारत आणि युक्रेनच्या शिष्टमंडळामध्ये यावेळी द्विपक्षीय बैठक पार पडली
दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणे तसेच आरोग्य, कृषी, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.झेलेन्स्की यांनी यावेळी भारताच्या शांततेच्या प्रयत्नांचं कौतुक केलं.दरम्यान, जयशंकर हे कीव्हमध्ये असतानाच रशियाचा कीव्हवर हल्ला झाल्यामुळे झेलेन्स्की यांनी रशियावर जोरदार टीका केलीय.