Washim No Rain | वाशिममध्ये 50 दिवसांपासून पावसाच खंड, पिकं करपल्याने शेतकरी चिंतेत | NDTV Marathi

Washim No Rain | वाशिममध्ये 50 दिवसांपासून पावसाच खंड, पिकं करपल्याने शेतकरी चिंतेत | NDTV Marathi Washim faces a 50-day dry spell; farmers worried as crops wither. वाशिम जिल्ह्यात गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.ज्या पिकांकडे पाहून शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामाची स्वप्नं रंगवली होती, तीच पिकं आता त्यांच्या डोळ्यादेखत करपून जात आहेत. सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागल्या आहेत.मात्र त्या शेंगांमध्ये दाणेच भरले नसल्याचं विदारक चित्र शेतांमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे पीक उभं आहे. पण त्यात उत्पादन नाही. महिनोनमहिने केलेली मेहनत, खर्च केलेला पैसा आणि कुटुंबाच्या भविष्याची बांधलेली स्वप्नं...सगळंच आता पावसाच्या प्रतीक्षेत अडकून पडलंय.

संबंधित व्हिडीओ