Sindhudurg Ganeshotsav | 65 गावांचं प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्र, गोवा सीमेवरील बांद्याचा बाप्पा

Sindhudurg Ganeshotsav | 65 गावांचं प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्र, गोवा सीमेवरील बांद्याचा बाप्पा Banda's Bappa, representing 65 villages on the Maharashtra-Goa border. कोकणातील गणेशोत्सवाची ओढ, तिथला उत्साह आणि बाप्पावरील अथांग श्रद्धा काही वेगळीच असते. यातच सध्या चर्चा रंगलीये ती म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील एका अत्यंत प्रसिद्ध आणि मानाच्या बाप्पाची... तब्बल ६५ वर्षांची भव्य परंपरा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा सार्वजनिक बाप्पा, म्हणजेच 'बांद्याचा बाप्पा'! ​ तब्बल ६५ गावांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्र आणि गोव्यातून लाखो भाविक बांदा येथील विठ्ठल मंदिरात हजेरी लावतात. यंदाही या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय. ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील विठ्ठल मंदिरात दरवर्षी साकारणारा 'बांद्याचा बाप्पा' हा संपूर्ण कोकणात आणि गोवा राज्यात भक्तांच्या श्रद्धेचं मुख्य केंद्र ठरला आहे. यंदा या मंडळाचं ६५ वे वर्ष असून, ६५ गावांची एकता आणि भावना या बाप्पाच्या रूपात पाहायला मिळते.

संबंधित व्हिडीओ