Amravati Drought | अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, 69 महसूल मंडळांतील परिस्थिती चिंताजनक
Drought looms over Amravati district; situation in 69 revenue circles is concerning.
अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. पावसाने सातत्याने ओढ दिल्याने जिल्ह्यातील ९२ पैकी तब्बल ६९ महसूल मंडळांमध्ये पीकपाण्याची स्थिती भीषण झाली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला होता. मात्र सप्टेंबरमध्ये परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या १८ दिवसांत अपेक्षित ९७.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६१.७ मिलिमीटर पाऊस झाला.