२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर एकाच झटक्यात पाणी…डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या हातात आता फक्त अनिश्चिततेची राख आलीय..ही गोष्ट आहे 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतल्या विद्यार्थ्यांची...कारण एकच परीक्षा द्यायला 22 लाखहून अधिक विद्यार्थी गेले. पण यातल्या काहींची मॅच फिक्सिंग ही आधीच झालेली होती..कारण त्यांच्या हातात 720 पैकी 600 मार्कांचा पेपर आला होता..यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रुपये मोजले होते. आणि यामागचं कनेक्शन आहे महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये...कोण आहेत याचे गुन्हेगार, कसा फुटला नीटचा पेपर पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.