NCP मध्ये गलतीसे मिस्टेक की ठरवून केलेला गेम? राष्ट्रवादीच्या यादीत पटेल, तटकरेंची नावं नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत प्रचंड मोठं राजकारण सुरू आहे... पक्षांतर्गतच शह आणि काटशहंचं राजकारण सुरू झालंय... प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना ठरवून साईडलाईन करण्याचे प्रयत्न सुरू झालेत की काय, असं सध्या चित्र आहे.... कारण सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची एक यादी जाहीर झाली... या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावंच नाहीत... ही यादी समोर येताच एकच खळबळ उडाली... त्यानंतर सुनेत्रा पवारांनी मध्यरात्री एक ट्विट केलं... मात्र जो मेसेज जायचा तो गेलाच.... राष्ट्रवादीमध्ये आणखी एक चर्चा आहे... ती म्हणजे राष्ट्रवादीत दुसरंच कुणीतरी आहे... जे या सगळ्या सोंगट्या हलवतंय.....

संबंधित व्हिडीओ