छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम आहे... पुन्हा एकदा तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून शहरात तब्बल 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आलीय... याआधी 26 एप्रिल रोजीही इतक्याच तापमानाची नोंद झाली होती.. वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेत... दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.. अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलंय.. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलंय.. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे आणि उष्माघातापासून काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.