सिंधुदुर्गमध्ये अनेक गावांमध्ये गव्यांचा हैदोस बघायला मिळतोय. वारंगी, तुळसोली, बांबरवाडी या ठिकाणी गव्याच्या कळपानी हैदोस घातला. शेतकऱ्यांची काजूबाग, कलिंगड, चवळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. वीस ते पंचवीस काजू कलमे गव्यांनी मोडून टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसतोय.