IND Vs PAK | भारत-पाकिस्तानमध्ये आज 'महामुकाबला', थेट कोलंबोमधून प्रतिनिधी विमल मोहन LIVE

टी-20 वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना आज रंगणार आहे. क्रिकेटमधील राजकारणाचा अडथळा 'तात्पुरता' दूर झाल्यामुळे टी-२० विश्वचषकातील भारत वि. पाकिस्तान लढतीची प्रतीक्षा अखेर संपली.आज पारंपरिक प्रतिस्पर्धी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.भारताच्या मधल्या फळीसमोर पाकिस्तानच्या फिरकीपटूंचे आव्हान असेल. चाहत्यांच्या आशा-आकांक्षा ध्यानात ठेवून दोन्ही संघ विजयासाठी ताकद पणाला लावतील, हे निश्चित आहे. या महत्त्वाच्या सामन्यातील विजेता सुपर 8 मध्ये पात्र ठरेल, कारण दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे प्रत्येकी चार गुण आहेत.

संबंधित व्हिडीओ