Beed| साखर महाग मग शेतकऱ्यांचा उसाला भाव का नाही? शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल

साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली.मात्र या दरवाढीचा फायदा नेमका कुणाच्या खिशात जातोय, हा सवाल आता उपस्थित होतोय. कारण साखरेचे दर वाढले, पण त्याचा फायदा शेतकऱ्याच्या पदरी पडताना दिसत नाही.उलट व्यापारी आणि कारखानदारांचाच फायदा होत असल्याचा आरोप बीडमधील शेतकऱ्यांनी केलाय. मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवलीय, शेती संकटात आहे. अशा परिस्थितीत उसाला योग्य भाव मिळणे ही शेतकऱ्यांची गरज आहे. साखरेच्या दरात वाढ होऊ शकते, तर उसाच्या दरातही त्याच प्रमाणात वाढ का नाही. असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी. #Beed #Farmers #SugarPriceHike Sugar is expensive, so why aren't farmers getting a good price for their sugarcane? Farmers' angry question to the government.

संबंधित व्हिडीओ