Pandharpur| विठ्ठल-रुक्मिणीचे महावस्त्रे भाविकांसाठी उपलब्ध, गुरुवारपर्यंत मिळणार महावस्त्र

विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला परिधान केलेले व अर्पण केलेल्या महावस्त्रांची पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विक्री सुरू करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांपासून महा वस्त्रांची विक्री सुरू आहे. यामध्ये 20 लाख रुपयांच्या वस्त्रांची विक्री झाली आहे.देवाच्या महा वस्त्रांची विक्री ही 27 ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे लाडक्या विठुरायाने अर्पण केलेले सोवळे , शेला तसेच रुक्मिणी मातेच्या साड्या विकत घेण्यासाठी भाविकांची मोठी चढाओढ पंढरपुरात दिसतेय. #VitthalRukmini #pandharpur Mahavastra' of Vitthal-Rukmini available for devotees will be available until Thursday.

संबंधित व्हिडीओ