केंद्राच्या किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात नाफेड व एन.सी.सी.एफ.च्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा आता दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरू झालेली आहे.लासलगाव रेल्वे स्थानक येथून एका रॅकद्वारे हा 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीत पाठवला जाणार आहे. दरम्यान बफर स्टॉकमधील हा कांदा दिल्लीत गेल्यावर त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावावर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला 3500 ते 4000 रुपये भाव मिळत असतांना शेतकरी समाधानी होत असतांना केंद्र सरकार कांद्याचे भाव या माध्यमातून पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे..नाफेड व एन.सी.सी.एफ.ने खरेदी केलेला कांदा आम्ही दिल्लीत जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे..केंद्र सरकार ग्राहक हित बघता मग शेतकरी हित कधी बघणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे..केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रति असलेले हे चुकीचे धोरण न बदलल्यास रास्तारोकोसारखे तीव्र आंदोलन छेडले जाईल.. असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.लासलगाव रेल्वे स्थानकातून आढावा घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी.
#OnionBufferstock #onion
Opposition to sending onion buffer stock to Delhi; interaction with farmers at Lasalgaon railway station.