तुम्हाला जर कपड्यांना कडक इस्त्री हवी असेल, तर त्यासाठी आता तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत कारण राज्यभरात लॉन्ड्री व्यासायिकांनी इस्त्रीचे दर आता 5 ते 10 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळं रोज इस्त्री करून कपडे घालणाऱ्या ग्राहकांचे काहीसे बजेट कोलमडले आहे .नक्की ही दरवाढ का झाली, सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याबाबत लॉन्ड्री व्यासायिक आणि ग्राहकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी...