मुंबईतील पवई पोलिसांनी बनावट भाडेकरार प्रकरणात मनसेचे पदाधिकारी गणेश चुक्कल यांना अटक करण्यात आलीय. गणेश चुक्कल यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. हिरानंदानी परिसरातील एका विकासकाची फसवणूक आणि खंडणीचा चुक्कल यांच्यावर आरोप आहे.तसेच हिरानंदानी ग्रुपच्या संचालिका अलका भाटिया यांची बनावट स्वाक्षरी केल्याचाही आरोप आहे.