खासदार Supriya Sule मस्साजोग आणि परळीच्या दौऱ्यावर, देशमुख-मुंडे कुटुंबियांची घेतली भेट | NDTV मराठी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग आणि परळीत खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला आज 69 दिवस उलटले तरीही आरोपी कृष्णा आंधळे अद्याप हाती लागलेला नाही.आज खासदार सुप्रिया सुळेंनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं आणि तपास कुठपर्यंत आलाय.याची माहिती घेतली.दरम्यान सरकार आमचे फोन ट्रॅप करतं मग कृष्णा आंधळेचा सीडीआर का काढता येत नाही.वाल्मिक कराडमागे मोठी शक्ती असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलंय.जो नेता यामागे असेल त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही सुळेंनी केली.मस्साजोगनंतर सुप्रिया सुळे परळीत पोहोचल्या.महादेव मुंडे यांच्या पत्नीची भेट घेऊन हत्येच्या तपासाचा आढावा घेतला. दरम्यान 15 महिन्यानंतरही आरोपी मोकाट असून पोलीस तपासाबाबत कुठलीही माहिती देत नसल्याचं महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं.यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी तातडीनं बीडचे पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि तपासाची संपूर्ण माहिती द्यायला सांगितली..

संबंधित व्हिडीओ