एका सीडीची राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांपासून चर्चा होती, ती सीडी नेमकी कुणाची आणि कशाची याचं कारण आता समोर आलंय. सर्वात आधी एकनाथ खडसेंनी ही सीडी असल्याचं सांगितलं होतं, आता त्या सीडीच्या चाव्या कुणाच्या हातात आहेत, तेही समोर आलंय. जळगावच्या जामनेरमध्ये राहणाऱ्या प्रफुल्ल लोढा नावाच्या माणसाकडे ही सीडी असल्याचं सांगितलं जातंय. या लोढाचं म्हणणंय त्यानं एक बटण दाबलं तर अख्खा देश हादरेल, पाहुया कुणाची आहे ही सीडी आणि काय आहे या सीडीमध्ये...