#eknathshinde #ganeshnaik #shivsena #bjp #thane #elections #ndtvmarathi मुंबई महापालिकेच्या पाठोपाठ ठाणे महापालिकेची निवडणूकही अत्यंत अटीतटीची होणार आहे. 'ठाणं कुणाचं?' या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. भाजपने ठाण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी गणेश नाईक यांना मैदानात उतरवले आहे. गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सणसणीत चार गंभीर आरोप केले आहेत. यामुळे नाईक विरुद्ध शिंदे हा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.