Nandurbar| सातपुड्याच्या दुर्गम भागात रोजगाराचा गंभीर प्रश्न; धडगाव,अक्कलकुवा भागातून स्थलांतर सुरु

सातपुड्याच्या दुर्गम भागात रोजगाराचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ऐन दुष्काळात आदिवासी बांधवांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. स्थानिक पातळीवर हाताला काम नसल्यामुळे धडगाव आणि अक्कलकुवा भागातील मजुरांनी दसऱ्याच्या सणापूर्वीच गाव सोडण्यास सुरुवात केली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी इतर जिल्हे आणि परराज्यात जाणारे हे आदिवासी बांधव रात्रीच्या अंधारात मिळेल त्या वाहनाने अत्यंत दुर्दैवी आणि असुरक्षित प्रवास करत आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबासह स्थलांतर करण्याची ही वेळ हृदयद्रावक आहे शासनाच्या रोजगार योजना वाड्या वस्त्यांवर कुचकामी ठरल्याचेच हे विदारक चित्र असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आदिवासींचे हे जगण्याचे संघर्षमय स्थलांतर आजही सुरूच आहे. Nandurbar | Serious employment crisis in the remote Satpuda region; migration begins from Dhadgaon and Akkalkuwa areas.

संबंधित व्हिडीओ