दुष्काळी भागातील लग्नांची जबाबदारी Shivsena घेणार, दुष्काळग्रस्तांसाठी शिंदेंचा मदतीचा हात |Drought

राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे..दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या जिल्ह्यातील गरजू कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवाव्यात, असे निर्देश शिंदेंनी दिले आहेत... इतकंच नाही, तर दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांच्या घरात ठरलेल्या लग्नांची जबाबदारीही शिवसेना उचलणार असल्याची मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.मदतीचा हात आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या निर्णयाची राज्यभर चर्चा होत आहे. Shiv Sena to take responsibility for weddings in drought-affected areas; Shinde extends a helping hand to those hit by drought | Drought

संबंधित व्हिडीओ