NDTV मराठीच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय.नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.उपचारात हलगर्जीपणा केल्याने माहेश्वरीचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आलाय.जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर दोषी असल्याचे निष्पन्न झाले होते.अहवालात दोषी डॉक्टरांचे नाव न देण्यात आल्याने दोषी डॉक्टरांना जिल्हा रुग्णालय प्रशासन पाठीशी घालतय का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.पोलीसांच्या पुढील कारवाई कडे आता लक्ष लागून राहिलंय.याबाबत पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.