काश्मीरच्या श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधलाय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले होते. राज्य सरकारकडून हे सर्व पर्यटक विमानाद्वारे महाराष्ट्रात आणले जात आहेत.त्यांची श्रीनगरमधून सुटका झाल्यानंतर या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधत राज्य सरकारचे आणि अजित पवार यांचे आभार मानलेत.