पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे आलेले पर्यटक भीतीच्या गर्तेत गेले होते.हल्ला झाल्यानंतर मदतकार्य करायला आलेल्या जवानांना पाहून पर्यटकांच्या कुटुंबातील लहान मुलांनी टाहो फोडला. कारण दहशतवादी सुद्धा पोलिसांच्या वेशात आले होते. भारतीय जवानांना पाहून पुन्हा दहशतवादी आलेत अशीच भीती मुलांना वाटली.त्यामुळे मुलं भयभीत झाली. अखेर जवानांनी त्यांना धीर दिला. तुमची मदत करायला आलो आहोत असा विश्वास दिला आणि तेव्हा कुठे ही मुलं शांत झाली. भारतीय जवांनांनी सर्व मुलांना आणि महिलांना सुरक्षित स्थळी नेलं