भारताच्या शेजारील दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरु झालंय.. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा अफगाणिस्ताननं बदला घेतला आहे.अफगाणिस्ताननं सीमाभागातील पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केलं.आणि मल्टीबॅरल रॉकेट लाँचरनं पाकिस्तानवर हल्ला केला.पाकिस्तानच्या 15 ठिकाणांवर अफगाणिस्ताननं हल्ला केल्याची माहिती मिळतेय.सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रतिहल्ल्यांनंतर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्यात.याशिवाय, पाकिस्तानी सैन्य चौकीवरून पळून गेले. पाकिस्तानच्या 55 जवानांना ठार केल्याचा अफगाणिस्ताननं दावा केलाय. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दोन तास अफगाणिस्तानच्या काबूल आणि कंधारवर हवाई हल्ले केले.