वसंत पंचमीच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी खास बेंगलोर येथून डिझायनर पोशाख मंदिराकडे आला आहे. पांढरा शुभ्र असा रेशमी हातमागावर विणलेला पोशाख विठ्ठल अन् रुक्मिणी मातेस परिधान केला जाणार आहे. या पोशाखात पांढरे शुभ्र धोतर, उपरणे , पागोटा , कोईमतूर सिल्क , येवला पैठणी अशी शाही वस्त्रे आहेत. वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या रंगपंचमीलाही सुरुवात होते असते. विठ्ठलाचे पोशाख मंदिराकडे प्राप्त झाल्याने मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याची आता लगीनघाई सुरू झाली आहे.याचाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी..