Pune शिक्षक मतदारसंघात पाठिंब्याचं राजकारण तापलं, राज्य मुख्याध्यापक संघाचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबा

पुणे शिक्षक मतदारसंघात आता पाठिंब्याचं राजकारण चांगलंच तापलंय. शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिल्यानंतर आता राज्य मुख्याध्यापक संघ भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी उभा राहिल्याची माहिती आहे. पंढरपुरात झालेल्या मेळाव्यात संघाचे अध्यक्ष सुभाष माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार असलेल्या कौस्तुभ गावडे यांना यापूर्वी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीनेही पुरस्कृत उमेदवारी दिली होती. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात उमेदवारांसोबतच शिक्षक संघटनांचं बळ कुणाच्या पारड्यात जातं, याकडे आता लक्ष लागलंय

संबंधित व्हिडीओ