पुण्यात एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीवर आंदोलक विद्यार्थी पूर्णपणे ठाम आहेत.. दुसरीकडे सलग आठ दिवस चालू असलेल्या अन्नत्यागामुळे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणस्थळी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीचे काम सुरु आहे.. वाढता तणाव लक्षात घेता प्रशासनाने आंदोलनाचे ठिकाण बदलण्याचा प्रस्ताव तयार करून तो सादर केला आहे; मात्र जोपर्यंत आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत हे उपोषणस्थळ सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे...