बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले संदर्भात मोठी अपडेट हाती येतेय.बीड जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला अहवाल सादर केलाय. विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघात रणजीत कासले याला ड्यूटीच नव्हती.या प्रक्रियेदरम्यान तो सायबर पोलिस ठाण्यातच कार्यरत होता, असा अहवाल पोलिसांनी प्रशासनाला आणि प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे कासलेचे आरोप तथ्यहीन होतं, हे उघड झालंय.