दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.. लांजा तालुक्यातील खोरनीनको धरणाजवळील मानवनिर्मित धबधबा देखील प्रवाहित झाला आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर तन्मय दाते यांनी खोरनिनकोच्या या धरणाचे आणि धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपलं आहे. खोरनीनको धरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण करण्यात आले आहे. पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो. धरण आणि तिथंच धबधबा असा दुहेरी संगम पाहताना मन प्रफुल्लित होतं. फोटोग्राफर तन्मय दाते यांनी खोरनिनकोच्या या धरणाचे आणि धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपलं आहे. त्याची ही खास दृश्य..