अभिनेता सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सैफ अली खानवर हल्लेखोरानं सहा वार केले होते. वांद्र्यातील सैफच्या निवासस्थानी ही घटना घडली होती. गुरुवारी सकाळी सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयातच अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं होतं.