Satara| खटाव तालुक्यातील मुळीकवाडी या गावी ज्योतिबा,भैरवनाथ आणि खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात पार

सध्या गावो गावी वार्षिक यात्रा पार पडत आहेत.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मुळीकवाडी या गावी ज्योतिबा,भैरवनाथ आणि खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्योतिबाची रथयात्रा ही गावात काढण्यात आली. यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली. या यात्रेदरम्यान लेझीम,गजीनृत्य तसेच विविध पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित व्हिडीओ