शिवसेनेच्या आक्रमक दबावामुळे अखेर उपसभापती नीलम गोर्हे यांचा सातारा पोलीस अधिक्षक निलंबन निर्णय राखून ठेवण्यात आला.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार विधान परिषदेत आक्रमक झाले… त्यामुळे सभागृह स्थगित करावं लागलं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांसह बैठक झाली. या बैठकीतही शिवसेनेने आक्रमक पवित्रा कायम ठेवत निलंबनाच्या निर्णयावर ठाम भूमीका घेतली. त्यामुळे भाजपला शिवसेनेच्या आक्रमक दबावामुळे अखेर उपसभापती निलम गोर्हे यांनी घेतलेला निर्णय राखून ठेववा लागला