ठाकरेंच्या शिवसेनेतून एक महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत ठाकरेंच्या खासदारांनी चक्क एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. आधीच ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या प्रियंका चतुर्वेदीवरुन नाराजीनाट्य सुरू आहे.प्रियंका चतुर्वेदींऐवजी संजय राऊतांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्यानं आदित्य ठाकरे राऊतांवर चिडलेत. त्यानंतर बैठकीत प्रियंका चतुर्वेदी चिडून निघून गेल्या.त्यानंतर काही खासदारही प्रियंका चतुर्वेदींवर चिडलेत... ठाकरेंच्या दिल्ली आणि मुंबईत झालेल्या दोन बैठकांमधली ही स्फोटक इनसाईड स्टोरी