वसईत स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे भासवून एका ३५ वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे मूळ पुण्यात असल्याने पुढील तपास हडपसर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.या प्रकरणात आणखी महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिस तपास सुरू आहे.दरम्यान, ऋषिकेश वैद्य हा फरार झालाय.माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशी पोस्ट त्याने केलीय.