पुरुष आयोगाच्या मागणीसाठी Delhiत सत्याग्रह करणार, पुरुषांविरोधातील कायद्यात सुधारणा करण्याची मागणी

पुरुष आयोगाच्या मागणीसाठी येत्या शनिवारी दिल्लीत सत्याग्रह केला जाणार आहे.भारतातील कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था टिकवायची असेल तर कायद्यांत समानता आणा आणि पुरुष आयोगाचे गठन करा अशी मागणी करण्यात आली आहे...सेव्ह इंडियन फॅमिलीजतर्फे सत्याग्रह फॉर मेन किंवा पुरुष सत्याग्रहाचे आयोजन जंतर मंतर येथे करण्यात येत आहे.राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पुरुष आयोगाचे गठन करण्यात यावे, कायद्याचा दुरुपयोग आणि खोट्या केसेस थांबविण्यात याव्यात, पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्यात याव्यात आणि जेंडर न्यूट्रल कायदे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ