राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार 24 आणि 25 असा दोन दिवसाचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा करणार आहेत. ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विक्टर डान्टस यांनी दिली आहे. कोकणातील पक्ष संघटना वाढविण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना शरद पवार भेट देणार आहेत. 24 एप्रिलला शरद पवार दुपारी अकरा वाजता वेंगुर्ला येथील नाथ पै सेंटरला भेट देणार आहेत. त्यानंतर ते आरवली येथे भेट देणार आहेत. 25 ला ते आरवली होऊन आंबोलीला भेट देणार आहेत. दोन दिवसीय या दौऱ्यात ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वास्तव्य करणार आहेत.