मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणीची पुन्हा एकदा तपासणी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. बावीस सप्टेंबरला होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीत पारदर्शकता आणावी. यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवण्यात आलंय.