शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. भाविकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने विविध यंत्रणांच्या मदतीने पेढा उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि पेढे विक्रेत्यांवर एकाच वेळी धाडसत्र राबवले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सुमारे 700 किलो संशयित व निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर नगर परिषदेच्या एसटीपी प्रकल्प परिसरात त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या कारवाईमुळे पेढे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. याच कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी.