बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील सलमानबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सलमान खान याने वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, 2024 मध्ये झालेल्या गोळीबारानंतरच अभिनेत्याने हा मोठा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आता स्वतःच्या जमिनीवर भव्य घर बांधणार आहे. अभिनेत्याला 6 मजल्यांच्या घराची परवानगी मिळाली आहे… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचं काम पूर्ण झाल्यानंतर, संपू्र्ण खान कुटुंब एकचा घरात राहणार आहे.