चेतन आणि सिया यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे.दोघे एकत्र दिसणारा हा पहिलाच व्हिडिओ असून,त्यामध्ये चेतन आणि सिया क्रिकेट सामना पाहताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळत असत.याच काळात सिया सामना पाहण्यासाठी मैदानावर येत असे आणि त्याच दरम्यान चेतन आणि सियाची ओळख झाली.समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सिया चेतनच्या खांद्यावर डोकं ठेवून सामना पाहताना आणि आपल्या संघाला उत्साहाने चीअर करताना दिसत आहे.