सिंधुदुर्गच्या वेंगुर्लातील कुशेवाडा-आंबेगाडी रस्त्यावरील 'कैलासपती'चे झाड चर्चेचा विषय ठरतंय.अमेरिकेतील या कैलासपती प्रजातीच्या झाडाचं वसंत राणे यांच्याकडून 26 वर्षांपासून संगोपन करण्यात येतंय.हायपरटेन्शन, ट्यूमर यासारख्या आजारासाठी हे झाड उपयोगी समजलं जातं.हे झाड विस्तीर्ण वाढत असल्याने परिसरातील संरक्षक भिंत कोसळली. त्यानंतर ती भिंत हटवून त्या झाडाला मोकळीक दिली गेली.त्यानंतर आता या विस्तीर्ण वाढ चाललेल्या झाडाची चर्चा आहे.