मुंबई हाय कोर्टाने वाल्मीक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल वीस हजारांचा दंड ठोठावण्याचं स्पष्ट करताच याचिका माघारी घेण्याचं मान्य केलंय. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी याचिका जनहित याचिका दाखल केली होती. मात्र याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीला योग्य नसल्याचं मत नोंदवत मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणीला नकार दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हाय कोर्टाच्या देखरेखीखाली सिट मार्फत सुरू करण्याची ही याचिका याचिकेतून मागणी करण्यात आली होती.